पीएमश्री जि प शाळेत चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप व पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.

पीएमश्री जि प शाळेत चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप व पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.
भेंडा – (प्रतिनिधी ) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवाअहिल्यानगर
नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी जि प शाळेत इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम व इयत्ता पहिली च्या नवागत विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
या प्रसंगी व्यासपीठावर जलमित्र सुखदेव फुलारी, किशोर मिसाळ , पत्रकार – नामदेव शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – संदीप फुलारी ,महेश आमटे, संतोष रोकडे, श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.
सरस्वती पुजानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गुलाबपुष्प व खेळाचे साहित्य देऊन इ. पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर निरोप समारंभानिमित्त इ.चौथीतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रतिनिधिक स्वरूपात स्नेहा उगले,आदित्य शिंदे, प्रणव निकम इत्यादी विद्यार्थ्यांनी आपलें वर्गशिक्षक,आपली शाळा,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद शाळेतील मित्रपरिवार यांचे या चार वर्षात आपल्या जडणघडणीत किती मोलाचे योगदान आहे,याविषयी भरभरून सांगितले.यानंतर वर्गशिक्षक – दत्तात्रय नवगिरे, महेंद्र वडिणकर, सुरेश तळेकर यांनी चौथी तील विदयार्थी किती गुणी आहेत व प्रत्येक विद्यार्थांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत्ता आहे. या चार वर्षात विद्यार्थी व वर्गशिक्षक हे नाते एकमेकांविषयी आदराचे व आपुलकीचे निर्माण झाले आहे त्यामुळे निरोप देतांना
दुःख होत असले तरी यशस्वीरित्याv विद्यार्थी इ.पाचवीमध्ये पदार्पण करणार आहेत.याचा आनंद होत आहे.हे आपल्या भाषणातून सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक – संजय कडूस, ज्येष्ठ शिक्षक – पावलस गोर्डे,सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक – पोपट घुले
शाळेतील सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये असणारे विद्यार्थी चैतन्य कोलते, साईराज फुलारी इ. विद्यार्थ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर मिशन आरंभ व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी म्हणून अर्णव तळेकर याचा प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच इ. पाहिलितील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेत चमकल्याबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात मनुश्री आमटे व तिचे वर्गशिक्षक सतीशकुमार चाबुकस्वार व शाळेचे मुख्याध्यापक – संजय कडूस व शिक्षक वृंद यांचा मान्यवरच्या हस्ते सन्मान करण्यात आला.इ. चौथीतील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी,वर्गशिक्षक व मुख्याध्यापक असलेली मोठी प्रतिमा शाळेस सप्रेम भेट दिली.यावेळी विद्यार्थ्यांना मिस्टान्न भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पावलस गोर्डे, संजय थोरात, मंदाकिनी भापकर, श्रीम. सुनीता माळशिकरे, ताई गायकवाड, सुरेखा मंडलिक, निलेशा घुणे, ज्ञानेश्वर गोरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन – विमल देवकर यांनी केले, तर आभार कानिफनाथ दौंड यांनी मानले.