Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय

सावली दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला यश : चाँद शेख

दिव्यांगांना नवीन, दुबार शिधापत्रिका तसेच अंत्योदय योजनेप्रमाणे धान्य मिळणार.

0 4 0 5 3 7

सावली दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला यश : चाँद शेख

दिव्यांगांना नवीन, दुबार शिधापत्रिका तसेच अंत्योदय योजनेप्रमाणे धान्य मिळणार

शेवगाव प्रतिनिधी -असिफ सय्यद

शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालय शेवगाव यांचेकडून शिधापत्रिका अडचणी बाबत सावली संघटनेकडून
दिव्यांगांना दुबार शिधापत्रिका देणे, शिधापत्रिका ऑनलाईन करून दिव्यांग बांधवाना अंत्योदय धान्य चालू करणे, दिव्यांगगांना नवीन शिधापत्रिका देणे कुटुंबातील सदस्य यांचे नावे ऑनलाईन समाविष्ट करणे
अशा मागण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने दि. 27/06/2024 वार गुरुवार रोजी सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन बाबत मा प्रशांत सांगडे तहसीलदार शेवगाव यांच्याशी सावली संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांची चर्चा घडून आली असता दिव्यांगांच्या शिधापत्रिका बाबत असलेल्या मागण्या मान्य करून शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सर्वोतपरी मदत करण्याबात पुरवठा निरीक्षक मंगल पवार मॅडम यांना सांगीतले. पुरवठा निरीक्षक पवार मॅडम यांनी दिव्यांग बांधवांचे कागदपत्रे घेऊन लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. दिव्यांग बाधवांच्या मागण्यांना यश मिळाल्याने सर्व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी, सचिव नवनाथ औटी, संघटक खलील शेख, सह संघटक अनिल विघ्ने, अतिष अंगरख, किशोर अंगरख, महबूब सय्यद, बाबासाहेब गडाख, गोवर्धन वांढेकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन कुटुंबातील सर्वं सदस्य यांची ई केवायसी (E KYC) करून घेणेबाबत आवाहन मा तहसीलदार साहेब शेवगाव यांनी केली आहे. शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवानी देखील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची EKYC म्हणजेच कुटुंबातील सर्वांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन थम द्यावा.
*चाँद कादर शेख*
अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे