आमदार लंघे हे आमदार पदी विराजमान झाल्यानंतर विकास कामांचा उद्या वरखेड माळवाडी दुमला येथे श्री गणेशा…..

आमदार लंघे हे आमदार पदी विराजमान झाल्यानंतर विकास कामांचा उद्या वरखेड माळवाडी दुमला येथे श्री गणेशा…..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा २२१ मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे हे आमदार पदवी विराजमान झाल्यानंतर नेवासा तालुक्यामध्ये आपल्या स्थानिक निधीमधून विकास कामाची भूमिपूजन उद्या सकाळी ९ वाजता वरखेड माळेवाडी दुमला येथे संपन्न होणार आहे.
स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजनाचा शुभारंभ आ. विठ्ठलराव लंघे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .
त्यामध्ये माळेवाडी दुमला येथील हनुमान मंदिर सभा मंडप करणे रक्कम २० लक्ष रुपये, मौजे वरखेड येथे महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण करणे रक्कम रुपये १० लक्ष रुपये
मौजे वरखेड ढोकणे वस्ती व उंदरे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रक्कम १० लक्ष रुपये अशा एकूण ४० लक्ष रुपये किमतीच्या विकास कामाचे भूमिपूजन नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
पहिलेच अधिवेशन होताच आ.लंघे यांनी नेवासा तालुक्यामध्ये विकास कामाचा श्री गणेशा उद्या त्यांच्या हस्ते होताना पाहावयास मिळणार आहे. तरीही विकास कामाचा श्री गणेशा प्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वरखेड माळेवाडी दुमला परिसरातील शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी व ग्रामस्थांना केला आहे.