कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. – : युवा व्याख्याते संदीप जावळे..

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. – : युवा व्याख्याते संदीप जावळे……..
नेवासा प्रतिनिधी:- मंगेश निकम
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उपकार महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असे प्रतिपादन युवा व्याख्याते संदिप जावळे यांनी केले . रयत शिक्षण संस्थेच्या अंजनी येथील मा. आर आर . पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात संदिप जावळे बोलत होते .यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. राजाराम पाटील, अंजनीचे सरपंच प्रमोद शिंत्रे , नागेवाडी च्या सरपंच सौ. अर्चना भोसले, पोलीस पाटील शीतल आवटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते .