अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे पाणीही माणसाची एक मूलभूत गरज आहे:-आमदार विठ्ठलराव लंघे पाटील..

अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे पाणीही माणसाची एक मूलभूत गरज आहे:-आमदार विठ्ठलराव लंघे पाटील….
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती नेवासा येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 चे शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार लंघे बोलताना म्हणाले की अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे पाणी ही माणसाची एक मूलभूत गरज असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव लंघे यांनी जल व्यवस्थापन कृती १५ या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावरती अध्यक्षस्थान नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील हे होते तसेच तहसीलदार संजय बिराजदार, लखवाल साहेब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,जाधव साहेब, श्रीमती विजया धाडगे, दुबाले साहेब, विखे साहेब, गोसावी साहेब, दहातोंडे साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मृणाल धगधगे , पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार भूमी अभिलेखचे गोसावी साहेब ,भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, भाजप जिल्हा सचिव श्री प्रताप चिंंधे, राजेंद्र मते, सुनील हरदे ,किरण जाधव ,नवनाथ साळुंखे एडवोकेट अशोक कर्डक ,एडवोकेट विश्वासराव काळे आदिनाथ पटारे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कराळे साहेबांनी केले.
यावेळी आमदार लंघे म्हणाले की एक वेळी माणूस अन्ना वाचून एक दोन दिवस जगू शकेल परंतु पाण्या वाचून माणूस क्षणभर ही राहू शकत नाही म्हणून पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे पाणी आपल्याला जपून वापरणे ही काळाची गरज आहे पाण्याचा वापर काटकसरीने करून प्रत्येक थेंबाची किंमत आपल्याला दुष्काळी परिस्थितीमध्ये जाणवते त्यामुळे अगोदरच आपण पाण्याचा वापर जपून केला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये पाण्याची टंचाई आपल्याला भासनाणार नाही असे आमदार लंघेंनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले.
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत गोदावरी मराठवाडा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण यांच्या संकल्पनेतून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेत आहोत. असे आमदार लंघे बोलताना म्हणाले. भविष्य काळामध्ये पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आजच आपल्याला पाण्याच्या एक एक थेंबाची बचत करणे गरजेचे आहे तेव्हा कुठे भविष्यकाळत आपल्याला पाणी टिकेल तसेच वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे आमदार लंघे पाटील बोलताना म्हणाले.