दिघी कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपानराव नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे
निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

दिघी कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपानराव नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे
निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने सन्मान…..
नेवासा प्रतिनिधी –
दिघी कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड झाल्याबद्दल समस्त दिघी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
दिघी कार्यकारी सोसायटीची निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड करण्यात आली त्यांचा सन्मान आज दिघी येथील मारुती मंदिर प्रांगणामध्ये करण्यात आला या सन्मानसह प्रसंगी भेंडा गावचे युवा व सिद्धांत किड्सचे चेअरमन युवा नेते सिद्धांत नवले पाटील हे उपस्थित होते.
युवा नेते सिद्धांत नवले पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सदस्य यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच ते बोलताना म्हणाले गावाच्या जडणघडणीमध्ये सोसायटीचा मोठा मोलाचा वाटा असतो तसेच शेतकऱ्यांना मोठा आधार म्हणून विविध कार्यकारी सोसायटी कडे बघितले जाते त्याच अनुषंगाने आज निवड झालेली चेअरमन पदी सोपानराव नागवडे व व्हॉइस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची त्यांनी मनपूर्वक अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी दिघी गावचे माजी सरपंच संजय नागवडे म्हणाले की ही निवडणूक अहंकारा विरोधात सन्मानाची लढाई असून यामध्ये सन्मानाचा विजय झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले की नवनिर्वाचित सदस्य हे येणाऱ्या काळामध्ये तळागाळातील शेतकऱ्यांच्या अडी अडचणीत काम करतील व शेतकऱ्यांचे कामे मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ते पुढे बोलताना म्हणाले ही निवडणूक कोणत्या पक्षाची नसून ही निवडणूक अहंकारा विरोधात सन्मानाची असल्याचे त्यांनी बोलताना आपल्या भाषणातून सांगितले.
ही निवडणूक चेअरमन पदासाठी तेरा जागांसाठी घेण्यात आली होती.
तसेच व्हॉइस चेअरमन पदासाठी ही 13 जागांसाठी घेण्यात आली होती त्यामध्ये चेअरमन पदी विराजमान झालेले सोपान नागवडे यांना १३ पैकी ८ मते मिळाली तर व्हाईस चेअरमन पदी विराजमान झालेले रावसाहेब नागवडे यांना १३ पैकी ९ मते मिळाली.
तसेच निवड झालेले चेअरमन पदी विराजमान झालेले सोपान नागवडे व व्हॉइस चेअरमन पदी निवड झालेले रावसाहेब नागवडे यांची सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.
तसेच चेअरमन पदी विराजमान झालेले सोपानराव नागवडे व व्हाईस चेअरमनपदी विराजमान झालेले रावसाहेब नागवडे हे बोलताना म्हणाले की आम्ही भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सोसायटीच्या माध्यमातून घेऊ व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले .
दिघे गावच्या शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये विविध कार्यकारी सोसायटी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व तळागाळातील शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
या सत्कार समारंभ प्रसंगी दिघी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.