जिजामाता महाविद्यालयात शिवीमुक्त परिसराची शपथ.

जिजामाता महाविद्यालयात शिवीमुक्त परिसराची शपथ
नेवासा : – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिन संपन्न होत असताना जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात एक अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आला. महाविद्यालयाच्या परिसरात शिवी द्यायची नाही. अशी शपथ सरपंच श्री शरद आरगडे यांनी सर्व विद्यार्थी, कर्मचारी यांना दिली.
यामागे सौंदाळा गावाचे सरपंच श्री शरद आरगडे यांची संकल्पना आहे. त्यांनी शिवी मुक्त परिसर, गाव ही मोहीम सुरू केली आहे. ज्या मातेच्या उदरात आपण जन्म घेतो, त्या मातेचा सार्वत्रिक जीवनात उद्धार केला जातो. हा मातृत्त्वाचा, एकूणच स्त्रीत्वाचा अपमान आहे. हे लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिजामाता महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. ही व्याप्ती वाढवत नेत सर्वत्र शिवीमुक्त परिसर करण्याचा उद्देश आहे.
सरपंच श्री शरद आरगडे यांनी १ जानेवारी २०२५ पासून सौंदळा गाव व परिसरात शिवीमुक्तीच्या संकल्पनेची घोषणा केली. शिवी देणाऱ्याचा पुरावा दिला, तर शिवी देणाऱ्याकडून ५०० रुपये दंड आकारला जातो. स्त्री सन्मान आणि सामाजिक स्वास्थ्य ही या संकल्पनेमागील भूमिका देखील त्यांनी स्पष्ट कली. ‘शिवीमूक्त गाव व परिसर’ ही संकल्पना राबवणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे.
यावर्षी महाविद्यालयात विश्वस्त श्री. अशोकदादा मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मा. आ. पांडुरंग अभंग, मा. ॲड. देसाई देशमुख, मा. काशिनाथअण्णा नवले, मा. डॉ . नारायण म्हस्के, सचिव मा. अनिल पंडित शेवाळे, कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष लांडगे, प्राचार्य पोपट सिनारे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.