पहिल्याच अधिवेशनात देवगडच्या बाबाजींचा व देवगड देवस्थानचा नाम उल्लेख करनारे आ. विठ्ठलराव लंघे हे पहिले आमदार आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे:- ह.भ.प रंजाळे महाराज.

पहिल्याच अधिवेशनात देवगडच्या बाबाजींचा व देवगड देवस्थानचा नाम उल्लेख करनारे आ. विठ्ठलराव लंघे हे पहिले आमदार आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे:- ह.भ.प रंजाळे महाराज…..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आ.विठ्ठलराव लंघे हे दिघी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सदिच्छा भेटीदरम्यान गेले असता आजची कीर्तन सेवेचे कीर्तनकार ह.भ.प रंजाळे महाराज यांनी आ.विठ्ठलराव लंघे यांचे तोंड भरून कौतुक केले महाराज बोलताना म्हणाले की पहिल्याच अधिवेशनामध्ये देवगडच्या बाबाजींचा नाम उल्लेख करणारे राज्यातील पहिले आमदार कोणी असतील तर ते आहेत विठ्ठलराव लंघे पाटील ते दिघे येथील सप्ताह कीर्तन सोहळ्यात बोलत होते. तसेच ह.भ.प रंजाळे महाराज पुढे म्हणाले की धार्मिक कार्यासह सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणार हे राजकारण असतं तसेच स्वच्छ व सुंदर राजकारण करणारा नेता म्हणजे आ. विठ्ठलराव लंघे पाटील आहेत तसेच नेवासा तालुक्याला प्रगतीपथावर व विकास कामाच्या जोरावर तालुक्याचे नाव देशभर करतील असे ह.भ.प रंजाळे महाराज आपल्या कीर्तनातून म्हणाले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की दिघी गावा हे माझ्यावरती पूर्वीपासूनच प्रेम करत आलेल गाव आहे दिघी गाव हे माझे जिव्हाळ्याचे गाव असून पूर्वीपासूनच दिघे गावचा माझा ऋणानुबंध आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून जातानी दिघी गावांने मला खूप मोलाची साथ दिली आमदार लंघे म्हणाले की नेवासा तालुका ही थोर संत महंताची भूमी आहे मी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर पहिल्यावेळी बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी संत महंतांचा उल्लेख करण्याचा मला भाग्य लाभले त्यामध्ये जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाचा थोर ग्रंथ सांगितला गेला व लिहिला गेला ज्ञानेश्वर देवस्थान चा विकास करण्यासाठी आम्ही सर्व नेते प्रयत्नशील आहोत त्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर देवस्थानचा विकास होण्यासाठी मी नेवासा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी प्रयत्नशील आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने प्रत्येक गावामध्ये वाडी वरती प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो किर्तन ,प्रवचन ,भजन सर्व धार्मिक कार्यक्रम होतात म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची महती पूर्ण देशभरामध्ये व जगभरामध्ये पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करू तसेच देवगड देवस्थान चे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजां सारखे संत आपल्याला लाभले आणि गुरुवर्य बाबाजींच्याज्ञ माध्यमातून देवगड देवस्थान सारखे स्वच्छ देवस्थान आपल्याला या ठिकाणी अनुभवास मिळत आहे हे आपले परम भाग्य आहे .
तसेच शनेश्वर देवस्थान सारखे हे देवस्थान आपल्या तालुक्यामध्ये आहे व त्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेले देवस्थान म्हणून आज शनेश्वर देवस्थानची ओळख जगभरात आहे .
तसेच येत्या काळामध्ये सभागृहामध्ये नेवासा तालुक्यातील अनेक प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे व तो प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे.
तसेच माझ्या लाडक्या बहिणीचाही माझ्या विजयामध्ये मोठा वाटा आहे त्यांचेही अनेक प्रश्न मी माझ्या आमदारकीच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे आ. लंघे यांनी बोलताना सांगितले. आमदार लंघे हे नेवासा तालुक्यातील दिघे गावाती अखंड हरिनाम सप्ताह सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते.