जुने कायगाव येथे गोदावरी-गंगा प्रकट दिनानिमित्त गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते गंगापूजन

जुने कायगाव येथे गोदावरी-गंगा प्रकट दिनानिमित्त गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते गंगापूजन
नेवासा(प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावर नेवासा व गंगापूर तालुक्याच्या मध्यावर असलेल्या जुने कायगाव येथील रामेश्वर मंदिर येथे गोदावरी गंगा प्रगटदिन व जगद्गुरू तुकाराम महाराज अनुग्रह दिना निमित्त संत महंतांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.
यावेळी गोदावरी गंगा मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
गोदावरी गंगा प्रकट दिनाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रह दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन देवगड गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व धर्माचार्य डॉ.जनार्धन मेटे यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांचे गोदावरी पवित्र नद्यांचे महत्व सांगणारे हरिकीर्तन झाले.नद्यांचे पावित्र्य राखा,गोमातेच्या हत्याबाबत कडक कायदा करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले
कीर्तनानंतर आलेल्या सर्व संतांचे संत पूजन रामेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर महंत श्री भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते गोदावरी गंगेची महाआरती करण्यात आली.”हर हर गंगे””गोदावरी गंगा माता की जय”असा जयघोष यावेळी करण्यात आला.
यावेळी झालेल्या गोदावरी गंगापूजन सोहळयाच्या प्रसंगी रामेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संतोष बिरूटे व सौ वर्षा संतोष बिरुटे यांच्या हस्ते विधिवत पूजेने गोदामाईला साडी चोळी अर्पण करण्यात आली.
यावेळी झालेल्या गंगापूजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक,त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज,महंत हरिशरणगिरीजी महाराज,भरत चौरे महाराज,डॉ.जनार्धन महाराज मेटे, हभप योगीराज दादा महाराज वायसळ,हभप सीताराम महाराज,हभप मारोती महाराज जाधव,हभप विजय महाराज खेडकर,प्रवीण महाराज शिंदेवाडी, दत्तात्रय महाराज नवथर,ऋषी महाराज वाल्हेकर,कृष्णा महाराज पाचपुते,हभप अशोक महाराज निरपळ,हभप दत्तात्रय महाराज,सचिन महाराज गायकवाड,बाबासाहेब जाधव महाराज,अशोक महाराज पांडव,गणपत महाराज आहेर,माऊली महाराज आदमाने संजय महाराज निथळे,गणेश महाराज नारखेडे,जनार्दन महाराज लेशटवार,कृष्णा महाराज मुळे,किशोर महाराज नागापूर,महेश महाराज सुकासे,ज्ञानेश्वर महाराज कांबळे,नांगरे महाराज ही संतमंडळी उपस्थित होती
या सोहळ्याला सर्व संत महंत भाविक व सर्व पक्षीय राजकिय नेते मंडळी आदी महाराज मंडळी आणि गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड उपस्थित होते.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न सोनू गुरु देवळे व मकरंद गुरू पाठक यांनी केले यावेळी कायगाव,गणेशवाडी,लखमापूर अमळनेर, नवाबपूरवाडी,जामगाव,गळनिंब,भेंडाळा, प्रवरासंगम व रामेश्वर मंदिर संस्थान कायगाव यांच्या वतीने आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री रामेश्वर मंदिर देवस्थान समिती, ग्रामस्थ व भाविकांनी परिश्रम घेतले