कुकाणा येथील व्यापारी यांचा अब्दुल भैय्या शेख यांच्या नेतृत्वात नेवासा तहसील वर मोर्चा*

*कुकाणा येथील व्यापारी यांचा अब्दुल भैय्या शेख यांच्या नेतृत्वात नेवासा तहसील वर मोर्चा*
नेवासा : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाणा येथील व्यापारी राज्य मार्ग रुंदीकरण दहा मिटर पेक्षा अंतर कमी करणेबाबत नेवासा राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांचे नेतृत्वात मुक मोर्चा काढण्यात आला. कुकाणा येथील अंतराचा खुलासा कारणे, दहा मिटर चे अंतर कमी करणे, अतिक्रमनातून निघालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करुन कुकाणा व्यापारपेठेला नवसंजीवनी देणेबाबत नेवासा नायब तहसीलदार सानप साहेब यांच्या सोबत चर्चा केली.
पंधरा मीटर मधील अतिक्रमण ऐवजी दहा मीटर पर्यंत अतिक्रमण काढावे यासंदर्भात नायब तहसीलदार सानप यांच्या बरोबर युवा नेते अब्दुल भैय्या शेख आणि व्यापारी यांनी सविस्तर चर्चा केली.
अतिक्रमण दहा मीटर पर्यंत काढण्यात यावे या करिता मोर्चे करी व अब्दुलभैय्या शेख हे जिल्हा अधिकारी यांची देखील भेट घेणार आहे. हजारो कुटुंबाची गुजराण या रस्त्यालगत असणाऱ्या दुकानावर अबलंबून आहे. कित्येक वर्षांपासून दुकानदार यांची उपजीविका गुजरण याच व्यवसायावर अवलंबून आहे. उपजीविका करण्यासाठी दुसरे साधन नाही. मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न आदी. दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हजारो कुटुंबातील लोकांची उपजीविका अवलंबून आहे.
सदरील व्यापारी यांनी स्वतःहून रोड लगत असणाऱ्या दोन्ही बाजूला साईड गटार च्या बाहेर अतिक्रमण केले आहे. दोन तीन वर्षांपूर्वी अतिक्रमण होऊ नये म्हणून ही साईड गटार बनवण्यात आली होती. तेथील अतिक्रमण दुकानदार यांनी स्वतःहून काढून घेतले आहे. तरी दुकानदार आणि त्यांचे कुटुंब यांचा विचार करून योग्य ते कार्यवाही व्हावी व अतिक्रमण करणारे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा.
भेंडा कुकाणा येथील साईड गटार बाहेर असणारे व्यापारी दुकान अतिक्रमण चौपदरी रस्ता मंजुरी येऊ पर्यंत राहू द्यावे. सुमारे हजार ते बाराशे व्यापारी आणि त्यांचे कुटुंब उपजीविका करिता या दुकानावर अवलंबून आहे. भेंडा येथील दुकानदार विस ते पंचवीस गावे आणि कुकाणा बाजारपेठ येथे देखील विस ते पंचवीस गावांची बाजारपेठ या महत्वाच्या भेंडा आणि कुकाणा येथील व्यापाऱ्यांवर दैनिक गरजा भागणारे व्यवसाय आहे.
दुकानदार यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करावे अशी जिल्हा अधिकारी साहेब शासन आणि प्रशासन ला मागणी. आमच्या विनंतीचा मागणीचा विचार न झाल्यास नाईलाजास्तव आम्हांला आंदोलन करावे लागेल. यास सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील.