Breaking
ई-पेपर

न्यायालयाचा आदेश तरीही रस्ता बंद    रस्ता खुला न झाल्यास आत्मदहन..

0 4 0 7 8 4

न्यायालयाचा आदेश तरीही रस्ता बंद
रस्ता खुला न झाल्यास आत्मदहन..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

न्यायालयाचा आदेश असूनही शेजारील शेतकऱ्याने जेसीबीने खोदून खड्डा केलेल्या वहिवाटीचा रस्ता खुला न झाल्यास रस्त्या अभावी शेतातच उभ्या असलेल्या ऊसात सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा
ईश्वर गोविंद पाठक यांनी दिला आहे.
पाठक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , माझी भेंडा खुर्द शिवारात गट नं.११९ ही वडिलोपार्जित जमिन असुन माझ्या शेतामध्ये ८ एकर ऊस गळीतासाठी उभा आहे.  माझ्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी वहिवाटीचा रस्ता शेजारील शेतकरी अभयकुमार गंगाधर बर्गे यांनी जेसीबीने खोदुन बंद केलेला आहे .
त्या संदर्भात नेवासा येथील दिवाणी न्यायालयात  ७७८/ २०२३ ने दावा दाखल असुन दि. १०/२/२०२५ रोजी न्यायालयाने गट.क्र. १३३ च्या पुर्व बांधाने वादिने वापर करण्यास प्रतिवादीने हरकत अडथळा आणु नये असा मानाई आदेश दिलेला आहे . असे असुनही अजुनही रस्ता खुला न झाल्याने माझा ८ एकर ऊस शेतातच उभा आहे. नेवासा तालुक्यातील कारखाने दि.१ मार्च रोजी बंद झाले असले तरी इतर कारखाने अजुन चालु आहेत. तरी माझे कुटुंबाला दवाखाना खर्च मुलांचे शिक्षण व घरखर्च करण्यासाठी ऊसाचे कर्ज फेडण्यासाठी सदरील ऊसाची तोडणी होणे अत्यंत महत्वाची आहे . इतर साखर कारखाने सुध्दा २ ते ३ दिवसात बंद होणार आहेत .तरी मला कोर्ट आदेशानुसार रस्ता खुला करुन मिळावा . कारखाना बंद झाल्यावर माझे खुप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे .तरी मला ४ ते ५ दिवसात न्याय न मिळाल्यास मी माझ्या कुटुंबासह ऊसाचे शेतात पेटवून घेऊन आत्मदहन करणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे