उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाण्यात विविध कार्यक्रम…
मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.- शिबिराचा लाभ घेण्याचे तालुका प्रमुख संजय पवार यांचे आवाहन...

उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाण्यात विविध कार्यक्रम…
मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.- शिबिराचा लाभ घेण्याचे तालुका प्रमुख संजय पवार यांचे आवाहन…
कुकाणा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाणा येथे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाण्यात विविध कार्यक्रम शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहेत, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व कार्यसम्राट उदयोजक शिवसेना नेते प्रभाकर शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे उदघाट्न होणार आहे,
शिवसेना तालुका सदस्य नोंदणी अभियान तसेच कार्यकर्ते पक्ष प्रवेश मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कुकाणा येथील सिद्धिविनाय लॉन्स या ठिकाणी उदया रविवार दि. ९/२/२०२४रोजी सकाळी ९:00 या वेळेत होणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदाच उद्याच्या कार्यक्रमात सदस्य नोंदणी व कार्यकर्त्यांचे महत्वाचे प्रवेश होणार असून तालुक्यात शिवसेना वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं संघटन करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पदाधिकारी काम करत आहे, तसेच उदया होणाऱ्या या शिबिरात मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी व रक्तदान करण्याचे आवहान शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार यांनी केले आहे.