किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन.उत्साहात .

किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन.उत्साहात .
सोनई प्रतिनिधी — महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सोनई येथील अदिती फाऊंडेशन चे किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी बिज माता बिजमाता पद्मश्री राहीबाई पेरे या होत्या. मि जरी शाळा शिकलेली नसले तरी मि या मातीशी नाळ जोडली. उस तोडणी करताना करता स्थापन केलेल्या बचत गटांना ति तयार केलेली रोपे वाटप करत होती. सध्या च्या युगात केमिकल युक्त खताचा होत असलेला वापर हा माझ्या जिवारी लागला. त्याचे दुष्परिणाम मि भोगले. तेव्हा पासून मि सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. या साठी घरगुती बि तयार करुनच त्यांची लागवड केली पाहिजे तेव्हाच आपण रोग मुक्त होऊ असे बिजमाता राहीबाई पेरे यांनी बोलताना सांगितले. विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०२३/२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा तसेच शैक्षणिक स्पर्धा मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर तसेच पालकांचे मन जिंकले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका किर्ती बंग व सचिन बंग यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. कोळीगितावरील बालचमुंच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले. या वेळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, कोपरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके, ओम शांती च्या उषा दिदि, गणेश बेल्हेकर,सोमनाथ कचरे,अशोक भुसारी, अश्विनी बानकर, मंगल बानकर, किरण सोनवणे, प्रस्तावना हनुमंत फटाले सर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी मानले. .