स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इं.लि कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी फुलेल -: महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज.

स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इं.लि कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी फुलेल -: महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज.
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
शेतकऱ्याचे कामधेनु म्हणून ओळखला जाणारा गणथडी पट्ट्यातील स्वामी समर्थ शुगर ऍग्रो इंडिया लिमिटेड या साखर कारखान्याला देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भेट दिली . यावेळी गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज म्हणाले की स्वामी समर्थ कारखान्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धीकडे तसेच शेतकऱ्याची कामधेनू म्हणून हा कारखाना ओळखला जाईल .
तसेच कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे बिल ही वेळेवर दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद या कारखान्यामुळे मिळत आहे.
या वेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडियन लिमिटेड च्या तज्ञ संचालिका डॉ.ममता शिवतारे लांडे यांचे देवगड देवस्थानचे मंहत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी उत्तम व्यवस्थापनाबद्दल कौतुक केली. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी सर्व कारखाना परिसर फिरून बघितला व कारखान्याच्या स्वच्छतेबद्दल ही संचलिका डॉ. ममता शिवतारे यांचे कौतुक केले. तसेच गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी साखर व पोत्याचे पूजन केले.
यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालक सौ.ममताताई शिवतारे(लांडे) ,श्रीमती अहिल्याताई लंघे ,चीप इंजिनियर सोनवणे साहेब ,शेतकी अधिकारी नानासाहेब लंघे साहेब ,तुपे साहेब ,जाधव साहेब , साबळे साहेब ,सतर्कर साहेब,गुंड शशिकांत मामा ,धावडे सिक्युरिटी अधिकारी ,शेळके साहेब, तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच कृष्णा गरगडे ,सरपंच विनोद ढोकणे ,अरुण जाधव, प्रदीप सर्जे ,गुंजाळ पाटील, इलेक्ट्रिक इंजिनिअर गडाख साहेब राजेंद्र विधाटे, आणि परिसरातील देवगड भाविक भक्त उपस्थित होते.
यावेळी कारखान्याच्या वतीने गुरुवर्य महंत भास्करगिरीचे महाराज यांचे संत पूजन करण्यात आले. तसेच कारखान्याच्या संचालिका ममताताई शिवतारे लांडे यांनी गुरुवर्य भास्करगिरीचे महाराज यांनी कारखान्यावरती शुभ आशीर्वाद भेट दिल्याबद्दल गुरुवर्य बाबाजींचे स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडियन लिमिटेडच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त केले व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे (बाबाजींचे) शुभ आशीर्वाद घेतले.