श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास सुरवात..

महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मातंग समाजाचे आराध्यदैवत मानल्या गेलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास गुरुवार दि. १७ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे…….
नेवासा प्रतिनिधी-
यात्रा महोत्सव नियोजनासाठी प्रशासन मंदिर समिती तसेच स्थानिक प्रशासन सरसावले असून येणाऱ्या भाविकाच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पूर्णवेळ तयारी सुरु आहे .
१७ एप्रिल रोजी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक होईल. तसेच रात्री आठ वाजता मंदिरामध्ये मंत्रघोषात होमाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर यात्रेच्या मुख्य दिवशी १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कहार व भोई समाजाच्या वतीने पैठण येथून आणलेल्या पालखीची मंदिर समिती व गावकऱ्यांच्यावतीने विधिवत पूजा केली जाईल. पालखीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
भाविकांच्या गर्दीचा अदांज घेऊन मंदिर प्रशासनाकडून शिस्तीत रांगेत दर्शन घेता यावे यासाठी काळजी घेतली जात आहे. यात्रा काळात भाविकांसाठी नेवासा, शेवगाव, गंगापूर, श्रीरामपूर, नगर आदी ठिकाणांहून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाची नुकतीच बैठक पार पडली असून पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यांचे आश्वासन परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिले असून यात्रा काळात अवैध व्यावसायिकांची गय केली जाणार नसल्याची तंबी दिली आहे.
यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समिती उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे, सचिव कडूपाटील गोरे, सरपंच विनोद ढोकणे, उपसरपंच विलास उंदरे, मंदिर विश्वस्त मंडळाचे नवनाथ वाघ, रंगनाथ पवार, रामचंद्र कुंढारे, रावसाहेब कुंढारे, देविदास शिरसाठ, किशोर शिरसाठ, रामदास गोरे, भगवान जगधने, बाळासाहेब शिरसाठ, पोपट शिरसाठ, सुरेश शिरसाठ आदींनी केले आहे.