मनिषा कावरे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान

मनिषा कावरे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान
नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नजिक चिंचोली येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका – मनिषा एकनाथ कावरे यांना नुकताच नारीशक्ती पुरस्कार अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.यावर्षी मनिषा कावरे यांना ज्येष्ठ कवी ,साहित्यिक – अशोक नायगावकर(नवी मुंबई)यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार देण्यात आला .यावेळी संघटनेचे राज्य नेते रावसाहेब रोहकले , जेष्ठ साहित्यिक संजय कळमकर , महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा – जयश्रीताई झरेकर ,जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे ,शिक्षक बँकेचे माजी संचालक – राजेंद्र मुंगसे तसेच भारत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते .गेल्या वीस वर्षापासून मनिषा कावरे या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पाथरवाला ,अंतरवाली आणि नजिक चिंचोली अशा शाळांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नजिक चिंचोली येथे कार्यरत आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सहशालेय उपक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी त्या करून घेत असतात. या शाळेतील अनेक विद्यार्थी एन एम एम एस ,स्कॉलरशिप परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेले आहेत. क्रीडा स्पर्धेतही या शाळेने तालुकास्तर, जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक – निवृत्ती कर्डिले व सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे .या शाळेचे सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , अध्यक्ष तसेच सरपंच – वनमाला चावरे व सर्व ग्रा . सदस्य नजिक चिंचोली, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी – शिवाजी कराड व सर्व शिक्षक मित्र नेवासा यांनी मनिषा कावरे यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.व या कार्यक्रमास तालुक्यातून शिक्षक बंधू – भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.